Skip to product information
1 of 1

Payal Books

Yuvak, Sambhog Ani Prem | युवक, संभोग आणि प्रेम by AUTHOR :- Osho

Regular price Rs. 115.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 115.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
मी तुम्हाला सांगतो की कामशक्ती पवित्र आहे, ती ईश्वराचीच शक्ती आहे. सेक्सची शकती परमात्म्याची शक्ती आहे. म्हणूनच त्यातून ऊर्जा निर्माण होत असते आसिण नवं जीवन विकसित होत असतं. तीच तर सर्वात सहस्यमय अशी शक्ती आहे; मिस्टिरियस फोर्स आहे. म्हणून तिच्याशी वैर साधणं सोडून द्या.
आपल्या जीवनात प्रेमाचा वर्षाव व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर काम शक्तीची वैर करणं सोडून द्या. आनंदानं स्वीकार करा. तिच्या पवित्रतेचा स्वीकार करा. तिचा शोध घ्या. जसजसे तुम्ही तिच्यात खोलवर जाल तस तसं तुम्हाला आश्चर्यजनक अनुभव येईल. जिकक्या पवित्र मनानं तुम्ही तिचा स्वीकार कराल, तितकी कमशक्ती पवित्र होत जाईल. या उलट जितक्या अपवित्र, पापमयदृष्टीनं तुम्ही तिच्याकडे पाहाल तितकी ती कुरूप होत जाईल. वाईट ठरेल.
जेव्हा एखादा पती मंदिरात जावं तसं आपल्या पत्नीच्या निकट जातो, एखादी पत्नी जणू काही आपण परमात्म्याजवळ जातो त्या भावनेनं आपल्या पतीजवळ जाते… कारण दोन प्रेमी ज्यावेळी कामेच्छेनं जवळ येतात, संभोगाचा आनंद लुटतात, त्यावेळी खरंच परमात्म्याच्या मंदिरात जात असतात. तोच परमात त्यांच्या जवळीकतेत कार्यरत असतो. परमात्म्याची सृजनशक्ती कार्यरत होते.
-ओशो