योग एक विज्ञान आहे. ते काही धर्मशास्त्र नाही. हिंदू-मुस्लिम, जैन किंवा ख्रिश्चन अशा कोणत्याही आत्मज्ञान्यांना या योगाशिवाय सत्यप्राप्तीचे आत्मज्ञान मिळालेले नाही, मकग तो येशू असो वा महंमद पैगंबर, पतंजली असो वा बुद्ध किंवा महावीर, जीवनातल्या परम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्याला आपण रूढ अर्थाने धर्म म्हणतो त्याला श्रद्धेची जोड असते. योग ही श्रद्धेची नाही तर जीवनाच्या सत्याच्या दिशेने केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाची सूत्रबद्ध आचारपद्धती आहे.
ओशोंनी ‘योगाचे नवे पैलू’ या पुस्तकात योगरूपी सप्तदलांचे पुष्प अत्यंत साध्या; पण तितक्याच रसाळ भाषेत उमलवले आहे. योगाद्वारा मी कोण आहे हे जाणून घेऊन शेवटी मीच तो आहे, ‘अहं ब्रम्हास्मी’ या अंतिम मुक्कामापर्यंतचा प्रवास कसा करायचा हे सांगितले आहे.
Payal Books
Yogache Nave Pailu | योगाचे नवे पैलू by AUTHOR :- Osho
Regular price
Rs. 132.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 132.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
