Payal Books
Yerzara By Prafulla Shiledar येरझारा
Couldn't load pickup availability
Yerzara By Prafulla Shiledar येरझारा
हे पुस्तक अनेकानेक साहित्यविधा, अनेक भाषा, लेखक अन् प्रदेश यांच्या दरम्यान प्रफुल्ल शिलेदार यांनी दीर्घकाळ घातलेल्या येरझारांचा, साधलेल्या संवादाचा परिपाक आहे. ‘येरझारा’चा मोठा अवकाश कविता या साहित्यप्रकाराने व्यापला आहे. चंद्रकांत देवताले, विष्णु खरे, केदारनाथ सिंह, शमशेर बहादूर सिंह, विनोदकुमार शुक्ल, मंगलेश डबराल, राजेश जोशी, ग. मा. मुक्तिबोध या हिंदीतील कवींसह शंख घोष, सुरजीत पातर, निलीम कुमार या अन्य भारतीय, तसंच विस्लावा शिम्बोर्स्का, न्यूयॉर्क आणि बल्गेरियातले तरुण कवी – या साऱ्यांच्या कवितांची भाषांतरं इथे आहेत. त्यासोबतच्या नोंदींमध्ये शिलेदारांनी त्या त्या कवीच्या कवितेची वैशिष्ट्यं नेमकेपणाने टिपली आहेत. मराठीतल्या विंदा करंदीकर, शरदचंद्र मुक्तिबोध, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, ग्रेस, सतीश काळसेकर आणि भुजंग मेश्राम अशा तीन पिढ्यांतल्या कवींबद्दलचं चिंतन इथे वाचायला मिळतं. कवितेसोबतच, कविता महाजन, मल्याळी कथाकार मानसी यांच्या कथा-साहित्याविषयीचे, तसेच ‘रावण आणि एडी’, ‘एम आणि हूमराव’ या भाषांतरित कादंबऱ्यांवरचे लेख उल्लेखनीय आहेत. कवी, भाषांतरकार आणि जगभरच्या गंभीर साहित्याचा वाचक म्हणून शिलेदारांचं चिंतन भाषणं आणि इतर लेख यांमधून वाचायला मिळतं. पुस्तकाच्या अखेरच्या भागात वसंत आबाजी डहाके आणि चंद्रकांत देवताले या कवींच्या मुलाखती समाविष्ट केल्या आहेत. प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा – अशा दोहोंच्या वैचारिक अवकाशात घातलेल्या येरझारा असं या मुलाखतींचं स्वरूप ध्यानात येतं. कविता आणि गद्य या दोहोंचा समावेश असलेलं आणि इतका वैविध्यपूर्ण पैस व्यापणारं असं पुस्तक मराठीत एरवी क्वचितच वाचायला मिळतं. - नीतीन रिंढे
