गो. द. पहिनकर आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार (राष्ट्रपती पुरस्कार) महामहीम माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते स्वीकारताना.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक गो. द. पहिनकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या 16 महान राष्ट्रपुरुषांच्या या प्रेरणादायक जीवनकथा आजच्या युवा पिढीच्या मनात देशभक्तीची आणि सामाजिक बांधिलकीची ज्योत चेतविण्यात नक्कीच यशस्वी होतील असे मला वाटते. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना विविध परीक्षांमध्ये, निबंधलेखन आणि वत्तृत्त्व आदी स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी साहाय्यभूत होतील; तसेच सर्वसामान्यांनादेखील या रोचक जीवनगाथा वाचायला आवडतील यात तिळमात्र शंका नाही.
उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या या जीवनकथा पहिनकर यांनी अत्यंत ओघवत्या काव्यात्मक शैलीत वस्तुनिष्ठपणे रेखाटल्या आहेत.
– इंद्रजीत भालेराव