Whither Justice By Nandini Oza Translated By Priyanka Kulkarni
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
अनेक शतके परीघाबाहेर राहिल्यानंतर आज भारतीय स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर स्थान मिळवलं आहे. स्वतंत्र अन् निर्भय झाल्यामुळे आज स्त्रिया दररोज नवनवीन अडथळे ओलांडताहेत, अधिकाधिक सबल बनताहेत. ह्या पुस्तकात अशा स्त्रिया नाहीत. हे पुस्तक मूक स्त्रियांचे बोल मांडते, विस्मृतीत गेलेल्यांच्या नावांना उजाळा देते आणि शोषित स्त्रिया ज्यासाठी झुरतात तो न्याय त्यांना देते. ‘व्हिदर जस्टिस’ हा भारतातील तुरूंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप आहे. ह्यात हकीकती आहेत त्यांनी दिलेल्या विवीध कढ्यांच्या - सरकारविरुद्ध, कुटुंबियांविरुद्ध, गरीबीविरुद्ध. समाज स्वत:च खलप्रवृत्तींना जन्मास घालतो. अन् त्यांना विनाविलंब सजाही देतो. ह्या बिनचेह-याच्या, बिनआवाजाच्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्त्रिया अशा समाजात राहून लढा देत राहतात. चूरचूर झालेली स्वप्ने आणि तरीही मागे रेंगाळणा-या आशा यांच्या हकीकती येथे कथारूपात मांडलेल्या आहेत. ही मांडणी झाली आहे एका अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे. लेखकाने त्यांची हताशा आणि सामथ्र्य यांचे हुबेहूब वर्णन केलेलं आहे. नंदिनी ओजा यांनी बरोड्यातून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी कार्यक्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाचा एक भाग म्हणून त्या मध्यवर्ती कारागृहात राहिल्या होत्या आणि नंतर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ची पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून कैक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. ह्या दोन अनुभवांदरम्यान कैदी स्त्रियांच्या हकीकती त्यांना भिडल्या. सध्या त्या एका न्यासासमवेत काम करतात.