We Are Poor But So Many By Ela R Bhatt Translated By Suniti Kane
Regular price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 266.00
Unit price
per
‘सेवा’ (SEWA - SELF EMPLOYED WOMEN`S ASSOCIATION) हे इलाबेन भट्ट यांचं अलौकिक जीवितकार्य आहे. लहान-सहान व्यवसायांवर उपजीविका करणाऱ्या तळागाळातल्या लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून ‘सेवा’नं त्यांना त्यांच्या कुवतीची, हक्कांची आणि संघटित झाल्यामुळे लाभलेल्या बळाची जाणीव करून दिली आणि त्यांना सक्षम बनवून त्यांची परिस्थिती सुधारली. कचरा गोळा करणं, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणं, भरतकाम करणं, डिंक गोळा करणं, मिठागरांमध्ये मीठ बनवणं अशा विविध व्यवसायांतल्या स्त्रियांच्या मालाला बाजारपेठ आणि चांगले भाव मिळवून देणं, कर्जाच्या दलदलीतून वर काढायला स्वस्त दरानं कर्ज देणं, त्यांना इतर विविध सुविधा मिळवून देणं अशी अनेक कार्यं ‘सेवा’नं कशी तडीला नेली, याचा प्रेरणादायी, उद्बोधक अनुभव हे पुस्तक घडवतं. स्त्री-कल्याण, दारिद्र्य निर्मूलन, नोकरीच्या सुसंधीमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं!