Payal Books
Vyavsayatil Impressive Manners By Sheetal Kakkar Mehra
Couldn't load pickup availability
सेल्स, मार्केटिंग किंवा बिझनेस… तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत कार्यरत असलात तरी प्रभावीपणे संवाद साधता येणं हे व्यावसायिक यशासाठी अत्यावश्यक असतं. तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा समोरच्यावर परिणाम होत असतो. तुमच्या केवळ एका हस्तांदोलनातून किंवा अगदी दहा मिनिटांच्या भेटीतूनही तुम्हाला व्यवसायातल्या सुवर्णसंधी मिळू शकतात!
तुमच्या कामाच्या ठिकाणी वागण्या-बोलण्यातून विशेष ठसा उमटवण्यासाठी आवश्यक अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
उदाहरणार्थ…
हस्तांदोलन कसं करावं
बिझनेसकार्डची देवाणघेवाण कशी करावी
आपल्या ग्राहकाच्या स्मरणात व संपर्कात कसं राहावं
सहकारी, ग्राहक व बॉस यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन ठेवावं…
मिटिंगमध्ये किंवा बिझनेसपार्टीमध्ये काय व कसं बोलावं
क़ॉन्फरन्समध्ये किंवा बिझनेस इव्हेंट्सला जाताना वेषभूषा, केशरचना, अॅक्सेसरीज, पादत्राणं कशी असावीत
टेक्नॉलॉजीच्या साधनांद्वारे (इ-मेल, टेलि व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद कसा साधावा, इ.इ.
आपलं करिअर ‘प्रभावित’ करणार्या अशा सर्व कळीच्या मुद्दयांवर मार्गदर्शन करणारं पुस्तक… व्यावसायिक इंप्रेसिव्ह मॅनर्स!
