Payal Books
Vyatha Hindustan Phalanichya by Dr Girish Aphale व्यथा हिंदुस्तानच्या फाळणीची डॉ गिरीश आफळे
Couldn't load pickup availability
व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची लेखक - डॉ गिरीश आफळे * जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या अदलाबदलीची, पाकिस्तानी जिहादी अतिरेक्यांनी हिंदूंच्या केलेल्या वंशविच्छेदाची आणि या उलथापालथीत आपले प्राण पणाला लावून रा. स्व. संघांच्या ५००च्या वर स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानाची अंगावर शहारे आणणारी कहाणी.* 26 प्रकारणांचा, 469 उपाशीर्षकांच्या अंतर्गत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणारा, 204 संदर्भग्रंथांच्या अभ्यासातून 490 संदर्भांच्या तपशीलासह अभ्यासू लेखक डॉ. गिरीश आफळे ह्यांनी लिहिलेला ग्रंथ व्यथा हिंदुस्थाच्या फाळणीची! भारताची फाळणी अतिशय वेदनादायी होती. साधारणत: पाच ते दहा लाख हिंदूंना या फाळणीच्या दंगलींमध्ये फुटीर अतिरेक्यांनी मारले. सुमारे दीड कोटी हिंदूंना आपलं सर्वस्व सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावे लागले. 'फाळणी खरंच अटळ होती का'? याची सविस्तर चर्चा या पुस्तकात आहे. फाळणी म्हणजे भारतीय इतिहासातील हिंदू वंशविच्छेदाची (genocide) सर्वात मोठी घटना! या सर्व काळात काँग्रेसने मुस्लिम अनुनयाची पराकाष्ठा केलेली दिसते. या सर्व कठीण काळात हिंदू बांधवांचे जीवावर उदार होऊन जिहाद्यांपासून रक्षण करून त्यांना जिवंतपणे स्वतंत्र भारतात आणताना रा. स्व. संघाच्या ५०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी आत्मबलिदान केले.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील ‘लोकसंख्येची अदलाबदल किती योग्य आहे’ हे तर्कपूर्ण पद्धतीने समजावून सांगत होते. *अंगावर शहारे आणणाऱ्या फाळणीच्या जिवंत इतिहासाचे संदर्भासहित मांडणी करण्याचे काम लेखक डॉ. गिरीश आफळे यांनी 'व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची' या पुस्तकातून केले आहे.
