Payal Book
Vishi Tishi Chalishi (विशी तिशी चाळिशी) by Dr. Ashutosh Javadekar
Couldn't load pickup availability
‘ विशी.. तिशी.. चाळिशी..’ हे एक ललितबंध स्वरूपातील लेखन असून अरिन, माही, तेजस ही तीन मध्यवर्ती पात्र अनुक्रमे विशी, तिशी, चाळिशीचे प्रतिनिधित्व करतात. तीन मित्र - एक विशितला एक तिशितली आणि एक चाळिशीतला, त्यांच्यामध्ये असलेल्या पिढीनुसारच्या अंतरांमुळे असलेला विसंवाद, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यांचं हळूहळू एकमेकांच्या सहाय्याने उलगडत जाणारं आयुष्य अशा थीमवर छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून कथा समोर येते. गेल्यावर्षी डॉ. आशुतोष जावडेकर याच नावाने लोकसत्ता मध्ये सदर लिहीत असत. त्याच सदराच पूर्ण आणि विस्तृत व्हर्जन म्हणजे हे पुस्तक होय. डॉ. आशुतोष जावडेकर व्यवसायाने दंतशल्यचिकित्सक असून त्यांनी इंग्रजी भाषेमधून सुवर्णपदक कमावत एम.ए. केलेल आहे. मराठी भाषेतील तरुण लेखक – कवि, समीक्षक, आस्वादक आणि गायक – संगीतकार अशा बहू-प्रतिभावान लोकांत त्यांचे नाव अग्रणी घेतले जाते.

