Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Visarlele Pune By Dr. Avinash Sovani विसरलेले पुणे डॉ. अविनाश सोवनी

Regular price Rs. 1,300.00
Regular price Rs. 1,500.00 Sale price Rs. 1,300.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Visarlele Pune By Dr. Avinash Sovani विसरलेले पुणे डॉ. अविनाश सोवनी 

पुणे शहर ही जरी या पुस्तकातील मध्यवर्ती संकल्पना असली तरीही त्यातील  विषय मात्र थोडे वेगळे आहेत. ज्यांविषयींच्या पुसटशा आठवणीही लोकांच्या  स्मरणात उरलेल्या नाहीत अशा अनेकविध गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. एका दृष्टीने, काय हरवले? यापेक्षाही काय गमावले? काय काय विस्मृतीत गेले ?  हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या पिढीच्या सर्रास वापरात असलेल्या परंतु  कालौघात आपले अस्तित्व साफ नामशेष झालेल्या, तथापि नव्या पिढ्यांच्या  स्मरणातही नसलेल्या अशा अनेक बाबींचा लेखाजोखा यात मांडलेला आहे.  गेल्या पाऊणशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची ही एका परीने उजळणीच आहे असे मानण्यास हरकत नाही . माझ्या पिढीतील मंडळींच्या स्मरणात असणारे, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले  जग जर पन्नास वर्षांच्या कालौघात हरवून जात असेल, विस्मरणात जात असेल तर आजच्या नवीन पिढीतील मंडळींना ते कसे समजणार ?

तथापि, हे कुणीतरी त्यांना मुद्दाम सांगायला पाहिजे आणि केवळ याच  विचाराने मी ठरवले की, माझ्याच नव्हे तर माझ्या मागील पिढ्यांनी गेल्या  शंभर वर्षांत अनुभवलेल्या, प्रत्यक्ष जगलेल्या त्या भूतकाळाबद्दलची कहाणी 
विस्तृत रूपात लिहून नववाचकांसमोर मांडायची. वाचकांना, गतकाळातील या आगळ्यावेगळ्या संकल्पना निश्चितच भावतील  अशी अपेक्षा आहे आणि याच हेतूने सदर पुस्तक त्यांच्या हाती देताना मला 
नक्कीच आनंद वाटत आहे.