PAYAL BOOKS
Vijayavardhini Jijau By Dr. Shrimant Kokate
Couldn't load pickup availability
Vijayavardhini Jijau By Dr. Shrimant Kokate
जिजाऊ या अत्यंत महत्त्वाकांक्षी होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे, ही त्यांची दुर्दम्य इच्छा होती, ती त्यांनी आपले शौर्यशाली पती शहाजीराजे, क्रांतिकारक पुत्र शिवाजीराजे, नातू संभाजीराजे आणि कोट्यवधी जनतेत निर्माण केली. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी अनेक संकटांवर मात केली. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, परंतु संकटसमयी त्या नाउमेद, निराश किंवा हतबल झाल्या नाहीत. त्या स्वतः शूर, पराक्रमी, लढवय्या आणि उत्तम राजनीतिज्ञ होत्या. त्या उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी अनेक न्यायनिवाडे केले.
