Payal Books
Vijapurchi Adilashahi by v c bendre विजापूरची आदिलशाही
Couldn't load pickup availability
Vijapurchi Adilashahi by v c bendre विजापूरची आदिलशाही
सतराव्या शतकात दक्षिण भारतीय इतिहासावर प्रभाव टाकणारी 'आदिलशाही' ही एक बलशाली राजसत्ता होती. स्वराज्य विस्तार करत असताना शिवाजी महाराजांना अनेकदा बलाढ्य आदिलशाहीशी सामना करावा लागला. बहामनी साम्राज्यातून उदयास आलेल्या आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला 'बुसातीन-उस-सलातीन' हा पहिला पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी इसवी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला. हा ग्रंथ म्हणजेच 'विजापूरची आदिलशाही' होय. आदिलशाही राजवटीमध्ये होऊन गेलेल्या सर्व आदिलशहांच्या कारकिर्दीची इत्यंभूत माहिती या ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांपैकी असणारा हा एक 'साधनग्रंथ'.

