VICTORY CITY by SALMAN RUSHDIE
VICTORY CITY by SALMAN RUSHDIE
पंपा कंपाना ही बिसनागची राणी, कवयित्री तर होतीच; पण ती एक लोकविलक्षण स्त्री होती. ती नऊ वर्षांची असताना तिला देवीचा साक्षात्कार झाला. तिच्या अंत:प्रेरणेतून बिसनाग नगराची निर्मिती झाली. त्या नगरीचा पहिला राजा हक्कपासून शेवटचा राजा अळीय राया इथपर्यंतचा काळ तिच्या दोनशे सत्तेचाळीस वर्षांच्या आयुष्यात तिने पाहिला. पंपा कंपानाचा निर्भयपणा, कलाप्रेम, युद्धकौशल्य इ. गुणांतून तिचं व्यक्मित्त्वं तर ही कादंबरी उलगडतेच; पण तिने पाहिलेल्या राजकीय कारकिर्दींपेक्षा त्या कारकिर्दितील मानवी स्वभावाचे, अंतर्मनाचे पैलू उलगडून मानवी मनाचं, जीवनाचं वास्तव, सूक्ष्म आणि थक्क करणारं दर्शन ही कादंबरी घडवते.