Veerappan By Sunaad Raghuram Translated By Pramod Joglekar
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
"वीरप्पन...! कर्नाटक व तामिळनाडू राज्यांत धुमाकूळ घालणारा भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ क्रूर डाकू. आपल्या टोळीच्या मदतीने वीरप्पन निलगिरी पर्वतराजींमधील समृद्ध जंगलांतून करोडो रुपये किंमतीचे चंदन चोरतो; शंभराहून अधिक हत्तींना क्रूरपणे ठार मारून हस्तिदंत मिळवतो; त्याला पकडण्यासाठी गेलेले विशेष कृतिदलातले पोलीस अधिकारी, वनअधिकारी, पोलिसांना मदत करणारे गावकरी, अशा शंभराहून अधिक लोकांच्या त्याने निर्घृण हत्या केलेल्या आहेत. खंडण्या वसूल करणारा, अपहरणे करणारा, दहशतवाद निर्माण करणारा हा खुनी दरोडेखोर, तस्कर दोन राज्य सरकारांना आदेश देण्याइतका माजतो. इतकेच नव्हे, तर तामीळ दहशतवादी आणि नक्षलवादी संघटनांच्या संपर्कात आल्यावर अचानक त्याला आपण गोरगरिबांचा ‘मसीहा’ असल्याचा साक्षात्कार होतो आणि तो जगातल्या मोठमोठ्या क्रांतिकारकांचे दाखले देऊ लागतो! हा वीरप्पन कशाच्या बळावर एवढा पुंड झाला? उपग्रहांच्या मदतीने चालणारी दळणवळण यंत्रणा, प्रगत तंत्रज्ञान व हेलिकॉप्टर्स हाताशी असतानाही वर्षानुवर्षे वीरप्पन पोलिसांच्या हाती का लागू शकत नाही? सुनाद रघुराम यांनी या प्रकरणातील सर्व दस्तऐवज मिळवून व ते कसोशीने तपासून, अंगावर काटा आणणारे वीरप्पनचे गुन्हेगारी जीवन व त्याचे इतरांशी असणारे संबंध यांचा या पुस्तकात अचूक वेध घेतला आहे. एखाद्या कल्पितापेक्षाही हे वास्तवाचे चित्रण वाचकाला खिळवून टाकते! "