Payal Books
Vedancha to Artha वेदांचा तो अर्थ by ravindra godbole
Couldn't load pickup availability
ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद, आरण्यके, उपनिषदे, ब्राह्मण आणि सूत्र ग्रंथ. मानवी इतिहासाचा एक प्राचीन, विशाल आणि अद्भुत ठेवा !
इन्द्र आणि वायू, मित्र आणि वरुण, रुद्र आणि मरुद्गण, आश्विनीकुमार आणि 'वामन' रुपातील त्रिविक्रम विष्णू. या वैदिक देवांचे नेमके स्वरूप काय होते ? जलांमध्ये अग्नी उत्पन्न करणारा, अमरत्व देणारा, हिरण्याचे मूळ असलेला आणि स्वर्गातून धरतीवर आलेला'सोम' म्हणजे कोणता पदार्थ होता ?
अनेक प्रकारचे अग्नी ! स्वर्गात राहणारे वैश्वानर आणि मातारिश्वन् अंतरिक्षातील पवित्र अग्नी जातवेदस्, आणि यज्ञकुंडात प्रज्वलित केलेला मानवनिर्मित अग्नी यांच्यातील परस्पर संबंध काय होता?
यज्ञयाग करणारे भटके-पशुपालक वैदिक आर्य, महाभारतात वर्णन केलेली नगरे आणि राज्ये, सिंधू संस्कृतीच्या भग्न अवशेषांमधून प्रतीत होणारे तिचे भव्य, प्रगत आणि वैभवशाली रूप! हा एकाच प्राचीन संस्कृतीचा आविष्कार होता का?
आजपर्यंत अनुत्तरित राहिलेल्या अशा अनेक प्रश्नांची खगोलशास्त्राच्या आधाराने आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने शोधलेली 'तर्कनिष्ठ' आणि 'प्रांजळ' उत्तरे...
'वेदांचा तो अर्थ
