Vasturahasya By Dr. Narendra Hari Sahastrabuddhe, Dr. Ravindra Mahatme
Regular price
Rs. 197.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 197.00
Unit price
per
वास्तु, योग, ज्योतिष, संगीत आणि आयुर्वेद ही दर्शन शास्त्राची पाच उपांगे आहेत. ‘सर्वे ऽ पि सुखिन: सन्तु’ या एकमेव सुखोद्देश्यातून शास्त्रांची मांडणा ऋषि, मुनि व पूर्वाचार्यांनी केली आहे. ‘‘धियोऽयोन: प्रचोदयात्’’ या ऋतंभरा प्रज्ञेच्या प्रांगणात शास्त्रांनी गगनास गवसणी घालून विवेकाचा वेलू गगनावरी नेला आहे. बहुव्यापक व सर्वसमावेशक पद्धतीने शास्त्रांचा विकास झाल्याने विज्ञानाच्या छोट्या खिडकीतून शास्त्रांचे गगन मापणे हा खुळेपणा आहे. तत्त्व, उपाय, साधना व सिद्धी या चतुष्पाद-प्रणव पद्धतीने वास्तुशास्त्राचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ‘‘वास्तुरहस्य’’ या ग्रंथाच्या निमित्ताने केला आहे. यातील ‘‘न्यून ते सारे माझे आणि भव्य ते सारे पूर्वाचार्यांचे’’ या भूमिकेतून अभ्यासकांनी हे पुस्तक वाचावे.