वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला.
एकात्मतेची दिंडी निघाली.
समतेची पताका खांद्यांवर फडकली.
ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली.
भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण - घेवाण झाली.
सदाचाराचा व्यापार फुलला आणि 'अवघाचि संसार' सुखाचा झाला.
चैतन्यरूप प्रब्रह्म्हाला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल, म्हणजे वारी