Vanvas वनवास By Prakash Narayan Sant प्रकाश नारायण संत
Vanvas वनवास By Prakash Narayan Sant प्रकाश नारायण संत
प्रकाश नारायण संत यांची लंपन ही व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे. लंपनच्याच या तजेलदार, टवटवीत कथा. पौंगडावस्थेतील, शाळकरी मुलांच्या चिमुकल्या भावविश्वाचा उलगडा त्यांतून होतो. या कोवळ्या वयातील छोटेछोटे अनुभव, मनातील चलबिचल, प्रेम, हुरहूर, शाळेचं विश्व, सोबती आणि कुटुंबातील व्यक्ती असा सगळ्या गोष्टी बारीकसारीक तपशिलाने येतात.
सहज-सोपी, लवचिक भाषा, वळणदार शैली हे या कथांचं वैशिष्ट्य. शेत, ओढ, भोवारा, माडीवरची खोली, पाउलवाट, खेकडे अन् बेडकाच्या मजा अशा नागरी जीवनाचा स्पर्शही नसलेल्या गोष्टी येथे अनुभवायला मिळतात. हे साधं जग आणि त्यातील साधी माणसं वाचकाला एक जीवंत आणि हवाहवासा अनुभव देतं. पुन्हापुन्हा वाचाव्यात अशा या कथा.