Skip to product information
1 of 2

Payal Books

Vachta vachta वाचता वाचता--गोविंद तळवलकर

Regular price Rs. 314.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 314.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

'अखंडीत वाचीत जावे' असा समर्थांचा उपदेश आहे. पण ग्रंथसृष्टी अपरंपार आहे. ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवलकर हे निवडक ग्रंथांचा मधुसंचय करीत. या ग्रंथपुष्पांतील नेमका मध व सौरभ आकर्षून ती पुस्तके, लेखक आणि अनेकविध विषय यांना बोलते करून, वाचकांशी संवाद साधून त्यांना ज्ञानमंजुषा देण्यात 'वाचस्पतीं'चा हातखंडा होता. हा मध केवळ साखरपाक नसतो, कारण तो सर्व प्रकारच्या पुस्तकांतून गोळा केलेला असतो. त्यात एक कडवट, आकर्षक रुचीही असते; तौलनिक विवेचनामुळे आत्मनिरीक्षणास उद्युक्त झाल्याची. ही रुची घेतांना आपण हरवून जातो. विषयाच्या आणि देशकालमयदिच्या पलीकडे जातो. प्रसन्न शैली, विचारांची स्पष्टता, बुध्दिसौष्ठव, मर्मज्ञता, रसिकता यांमुळे इतक्या वर्षांनंतरही हे लेख ताजे वाटतात.. जगभरच्या राजकीय व वैचारिक विश्वाबरोबरच इतिहास, निसर्ग, ललित व साहित्यिक विश्वाची सुंदर सफर होते.. एखादी सर्जनशील वाङ्मयकृती वाचल्याचा आनंद होतो. या भव्य सृष्टीच्या दर्शनाने आपण मोहून जातो. हा आवाका थक्क करणारा आहे