{"product_id":"uttarparvat-ekda-ani-itar-mithak-katha-by-dr-aruna-dhere-उत्तरपर्वात-एकदा-आणि-इतर-मिथक-कथा-डॉ-अरुणा-ढेरे","title":"Uttarparvat Ekda ani Itar Mithak Katha By Dr. Aruna Dhere उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा डॉ. अरुणा ढेरे","description":"\u003cp\u003eUttarparvat Ekda ani Itar Mithak Katha By Dr. Aruna Dhere उत्तरपर्वात एकदा आणि इतर मिथक कथा डॉ. अरुणा ढेरे\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसीतेची गोष्ट\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eनदीचं पाणी आटून गेलं होतं. लहानसा ओहळ असावा, तशी एक अरुंद धार तेवढी शिल्लक होती. मावळतीच्या लालसर प्रकाशात ती अधूनमधून चमकत होती. माथ्यावरती आभाळात एखाददुसरी चांदणी उगवली होती आणि झाडांच्या दाटणीतून अंधाराचे विरळ लोट दिसू लागले होते. संध्येची वेळ उलटून गेली होती. आता नदीवर कोणी नव्हतं. आश्रम तसा दूर होता.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसीता हळूहळू नदीकाठाकडे आली. दूरपर्यंत पाहत ती तिच्या नेहमीच्या बसण्याच्या जागेकडे वळली. बाभळीच्या पायाशी दगड रचून केलेली एक छोटीशी देवळी होती. हातातलं लाल जास्वंदीचं फूल वाहून तिने देवीकडे पाहिलं. पांढरे, मोठाले डोळे रोखून देवी तिच्याकडेच पाहत होती. तिने देवळीत दिवा लावला.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतातोबा, म्हणजे वाल्मीकी तिथे राहायला आल्यावर त्यांचा आश्रम झाला. तो गजबजला. तेव्हा तो प्रदेश सोडून दुसरीकडे गेलेल्या इथल्या मूळच्या लोकांची असणार ही देवी! तिला नदीत सोडून गेले होते ते लोक. नंतर कुणाला तरी ती सापडल्यावर कुणीतरी तिला वर काढून इथे ठेवलं, कुणास ठाऊक कुठल्या श्रद्धा असतील हिच्याविषयी; कसल्या उपासना असतील! कसले मंत्र आणि कसले अभिचार असतील! कसले नैवेद्य आणि उत्सव तरी कोणते असतील! राम-लक्ष्मणांना त्या सगळ्याविषयी वाटणारी बोडी नावड, थोडी तुच्छता आणि थोडासा राग तिने पूर्वी अनुभवला होता. पण तिला त्या सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं. स्वच्छ, निरभ्र कुतूहल. माहीत नसलेल्या झाडावर उतरण्याविषयी पाखराला जसं वाटत असेल किंवा माहीत नसलेल्या बनात शिरताना एखाद्या हरणाला जसं वाटत असेल, तसं कुतूहल. बस्, आणखी काही नाही. भीती तर नाहीच नाही.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eदेवळीपुढे मोकळी जागा होती. लाकडाचे दोन सपाट, बसके ओंडके होते. आसपास चिंचेची आणि निंबाची पुष्कळ झाडं होती. तिथूनच नदीकडे जाणारी एक उताराची वाट होती. आश्रमातले लोक त्या वाटेने नदीवर जाणं शक्यतो टाळत असत. दुसऱ्या दोन वाटांनी त्यांची ये-जा असे. सीता त्या उतारवाटेकडे उदास पाहत राहिली.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eलक्ष्मण तिला इथे सोडून परत फिरला, तेव्हा नदीला पुष्कळ पाणी होतं. नावेतून ती उतरली आणि लक्ष्मणाच्या तोंडाकडे असंमजस पाहत राहिली. त्याने तिच्या दृष्टीला दृष्टी भिडवली नाही. ते त्याचं खाली पाहत अपराधी स्वरातलं, रडवेलं बोलणं... तिला त्याच्या बोलण्याचा अर्थबोधच न होणं... नंतर तिचं भानावर येणं... घडली गोष्ट खरी मानण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं... दूर कुठेतरी भारद्वाजाचा शुभशकुन सांगणारा आवाज निरर्थक ऐकू येत राहणं...\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50455596433601,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Uttarparvat_Ekda_ani_Itar_Mithak_Katha_By_Dr._Aruna_Dhere_..jpg?v=1785743119","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/uttarparvat-ekda-ani-itar-mithak-katha-by-dr-aruna-dhere-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%a2%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}