Skip to product information
1 of 2

Payal Books

Urjechya Shodhat By Priyadarshini Karve

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

' डॉ. प्रियदर्शिनी कर्वे!  एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही.  ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती.  म्हणजेच ‘दिनकर-इरावती’ या कर्वे दांपत्याच्या – जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ. आनंद कर्वे या – तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी.  म्हणजेच इरावतीबाईंच्या ‘परिपूर्ती’मधल्या ‘नंदू कर्व्या’ची मुलगी.  हिनं ‘पर्यावरणा’चा ‘वर्ल्ड टेक्नॉलजी नेटवर्क’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत - ‘हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!’)  ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या ‘आरती’ संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक ‘ॲशडेन पुरस्कार’ दोन वेळा मिळवला आहे.  समाजासाठी धडपडण्याचा ‘वेडा ध्यास’ हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे.  हिची थक्क करणारी आत्तापर्यंतची वाटचाल अन् क्षमता बघता एकच ओळ मनात येते – ‘किनारा तुला पामराला!’