Upyojit Marathi| उपयोजित मराठी Author: Santosh Shenai |संतोष शेणई
एखादी भाषा केवळ राजभाषा बनली म्हणून ती समर्थ बनत नाही किंवा केवळ तिच्या अभिजाततेच्या दर्जानेही ती समर्थ ठरत नाही. कालौघात टिकून राहण्याची क्षमता तिच्यामध्ये तेव्हाच येईल, जेव्हा जनजीवनासाठी आवश्यक असणारे सर्व व्यवहार सहजी व सुरळीतपणे त्या भाषेत घडू लागतील. मग व्यवहारातील एखादे कार्य पुरे करण्यासाठी तिला परकीय भाषेच्या कुबड्या वापराव्या लागणार नाहीत. व्यवहारातील सर्व प्रकाराची कामे ही मातृभाषेत, आपल्या मराठीत तेवढ्याच समर्थपणे, अचूकपणे पार पडू शकतात ही जाणीव झाली तरच ती दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग होईल. प्रा. रा. ग. जाधव, डॉ. सु. रा. चुनेकर यांसारख्या भाषेच्या ज्येष्ठ जाणकारांनी आणि सुधीर गाडगीळ, संदीप खरे यांसारख्या मान्यावर व्यावसायिकांनी अधिकारवाणीने मराठीच्या व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोजनाविषयी या पुस्तकात मांडलेले विचार ही वाचकांसाठी नक्कीच पर्वणी ठरू शकते. या पुस्तकाद्वारे व्यावहारिक मराठीच्या अभ्यासकांना ही संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, व्यावसायिक हृा सर्वांनाच उपयुक्त ठरेल असे हे संदर्भसाहित्य!