Payal Books
Aapal vishwa ani Tyanchi Navalakatha By sukalpa Kranajekar
Couldn't load pickup availability
आपलं विश्व आणि त्याची नवलकथा’ या आगळ्यावेगळ्या सचित्र ग्रंथात सुकल्प कारंजेकर यांनी विश्वाच्या उत्पत्तीपासून त्याच्या भवितव्यापर्यंत विविधांगी विश्ववेध घेतलेला आहे. विश्वशास्त्रासारख्या अद्भुत विषयाचा हा सुबोध, पण अभ्यासपूर्ण परिचय आहे. त्याला विज्ञानाची बैठक आहे, पण त्यात कथनातील कोरडेपणा वा तंत्रशरणता नाही. केवळ विज्ञानाच्या नव्हे, तर साहित्य-तत्त्वज्ञानाच्या अंगानेसुद्धा हजारो वर्षांची विश्वकहाणी ते रंजक पद्धतीने मांडत जातात. या मांडणीत आंतरविद्याशाखीयतेचा प्रत्यय येतो. नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार ग्रंथनिर्मितीवर भर देणाऱ्या ‘रोहन प्रकाशना’ने हाती ठेवलेली ही ‘सुकल्पित’ नवलकथा खचितच वाचक- विश्वाच्या पसंतीला उतरेल.
