Skip to product information
1 of 2

Payal Books

CHALA… SURYA BANU YA – YASHASVI JIVANACHI SAAT PAULE by Sirshree

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर आपले ध्येय सुनिश्चित असले पाहिजे. या ध्येयाप्रत पोचण्याची आपली कार्ययोजनाही तयार असली पाहिजे. हे करत असताना आपण जे केले आहे आणि जे करणार आहोत याचे भान असणे आवश्यक आहे. ते असले तरच कार्ययोजना सफल होतील आणि यशाची दारे आपल्यासाठी खुली होतील. हे ‘भान’ आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘मध्यांतर’ केलेले मनन.

 

दोन घटनांच्या मध्ये एक संधीकाल असतो. जसे दिवस संपून रात्र सुरू होण्याआधी त्या दोघांना जोडणारी संध्याकाळ असते, अगदी तसेच. एक वर्ष संपून दुसरे वर्ष सुरू होण्यापूर्वीचा काळ, एक काम संपून दुसरे सुरू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे हा संधीकालच. हेच आहे ‘मध्यांतर’. या मध्यांतरात आपल्याला मनन करायचे आहे.

 

असे ‘मनन’ जास्तीत जास्त प्रभावीपणे करणे प्रयत्नसाध्य आहे. ते एक शास्त्रही आहे आणि कलादेखील. हे शास्त्र, ही कला कशी आत्मसात करायची याचा मूलमंत्र हे पुस्तक आपल्याला देते. आणि स्वयंप्रकाशित व्हायचे असेल तर हा मूलमंत्र आपण अभ्यासलाच पाहिजे!