Skip to product information
1 of 2

Payal Books

SON OF BUDDHA – MAKING OF SPIRITUAL WARRIOR by Sirshree

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

आत्मशांती प्रदान करणारा आध्यात्मिक योद्धा

 

रोजच्या जगण्यात आपला अनेकांशी संपर्क येत असतो. काहींशी आपले ऋणानुबंध जुळतात, तर काही लोकांसोबत टोकाचे मतभेद होतात. कारण काहीही असो, आपल्या मनात आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल द्वेषाची रेष ओढली जाते. मग विचार करा, संपूर्ण आयुष्यभरात आपण अशा किती कर्मबंधनांमध्ये अडकून जाऊ? जीवनात आपण अनेक घटनांना सामोरं जात असतो, कित्येकांशी आपलं वैचारिक युद्ध होत असतं. कधी आपली चूक असते, तर कधी समोरील व्यक्तीची. पण अंतिमतः त्रास तर आपल्यालाच होतो. तुम्हाला या सर्व कर्मबंधनांतून मुक्त होत आत्मशांतीचा अनुभव घ्यायचाय? तुम्ही उत्सुक असाल, तर सन ऑफ बुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे.

 

सन ऑफ बुद्धा… एका महान लक्ष्याशी बांधील असणारा आध्यात्मिक योद्धा. तुम्ही या योद्‌ध्याला खूप जवळून ओळखता. खरंतर तुम्ही क्षणोक्षणी याच्या संपर्कात असता. प्रसंग कोणताही असो, घटना कितीही प्रतिकूल असो आणि तुमची मनोवस्था देखील कशीही असो… हा योद्धा तुम्हाला तुमच्या उच्चतम विकसित रुपापर्यंत घेऊन जाण्यासाठी शस्त्रांनिशी सदैव तत्पर असतो.

 

विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक थोडक्यात सर्वांनीच आवर्जून वाचायला हवं असं हे कथारुप मार्गदर्शन. कर्मबंधन, चुकीच्या सवयी आणि नकारात्मकतेतून पूर्णतः मुक्त होऊन जीवनार्थ जाणण्यासाठी आध्यात्मिक योद्धा बनण्याचा शुभारंभ करुया.