Payal Books
SARVOCHYA BHAKTICHA HIMALAYA – THE MEERA by Sirshree
Couldn't load pickup availability
द मीरा – ध्येयाला गवसली भक्ती
“मीरा’… भक्तीभावाने झळाळणारं सर्वोच्च आनंदाचं शिखर! सर्व विकारांतून आणि मोहपाशांतून मुक्त झालेली कृष्णभक्त. संत मीराबाईंच्या उल्लेखाशिवाय संतांची मांदियाळी अपूर्ण ठरते. अंतःकरणात शुद्ध भक्तीभाव असेल, तर मनुष्य संकटांचे पर्वतही सहज भेदू शकतो, याचं अजरामर उदाहरण म्हणजे संत मीरा! भक्तीच्या शक्तीला आकारच द्यायचा झाला तर मीरेची भावमुद्रा, तंबोरा सहजतया आपल्या नजरेसमोर येतो… पण मीरा म्हणजे केवळ बाह्य छबी नव्हे, तर ती आहे आंतरिक अवस्था… भक्तीने ओथंबलेली आणि जणू जीवनावरच विजय प्राप्त केलेली दिव्य अवस्था! ही पूर्णत्वाची भावावस्था मनुष्याचं जीवन सर्वोच्च आनंदानं भारुन टाकते.
तुम्हाला असा सर्वोच्च आनंद हवाय? मग विलंब कशाला? प्रस्तुत पुस्तक म्हणजे परमोच्च आनंदाप्रत घेऊन जाणारा दीपस्तंभच! सरश्रींच्या रसाळ लेखणीतून साकारलेलं “द मीरा’ हे पुस्तक म्हणजे परमानंदप्राप्तीच्या मार्गातील मैलाचा दगड.
