Payal Books
PARIVARASATHI VICHAR NIYAM – HAPPY FAMILYCHE SAAT by Sirshree
Couldn't load pickup availability
सरळ नियम, आश्चर्यजनक परिणाम
‘विश्वात आप्तस्वकीय आणि सहकारी यांच्या साहाय्यानेच मनुष्य कोणतंही मोठं यश प्राप्त करू शकतो’ या विधानाशी आपण सहमत आहात का? आपलं उत्तर जर “हो’ असेल, तर इतरांकडून सहकार्य कसं प्राप्त करावं? या विषयीचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आपल्याला मिळेल. इतकंच नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या सर्वोच्च शक्यता विकसित होण्यासही हे साहाय्यकारी ठरेल.
प्रेम, आनंद, विश्वास, शांती, माधुर्य आणि सुदृढ संवादमंच यांसारखे अनेक सकारात्मक पैलू आपल्या परिवाराचा पाया बनू शकतात. मात्र त्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरलेले “विचार नियम’ जाणून ते आत्मसात करायला हवेत. हे नियम अतिशय सहज, सरळ असले, तरी आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात.
प्रस्तुत पुस्तकात वाचा –
* आपल्या विचारांचा परिवारावर होणारा प्रभावशाली परिणाम
* आपल्या विचारांना दिशा देऊन आनंदित परिवार कसा निर्माण कराल
* कसा तयार होईल स्वस्थ परिवारासाठी “पॉवर हाउस’
* कुटुंबात प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य, समृद्धी आणि संतुष्टी आकर्षित करण्याचं रहस्य
* नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आपल्या परिवाराची रक्षा करण्याची युक्ती
* योग्य संवादाद्वारे परिवाराला स्वर्ग बनवण्याचं गुपित
* क्षमा, शोध आणि कृतज्ञतेच्या शक्तीने नात्यांमध्ये पूर्णता प्राप्तीचे उपाय
आपल्या कुटुंबात आश्चर्यकारक परिवर्तन बघण्याची अपेक्षा असेल, तर सात विचार नियम आणि उपाय जीवनात आचरणात आणा. मग बघा, आपल्याला जे हवंय, ते निश्चितच प्राप्त होईल!
