Payal Books
SADGURU NANAK: SADHANA RAHASYA AANI JEEVAN CHARITRA by Sirshree
Couldn't load pickup availability
जो बोले सो निहाल सत्श्री अकाल
ईश्वराने मनुष्याला काही सांगायचेच ठरवले, तर तो काय सांगेल? ईश्वर म्हणेल, “तू हवं ते कर. परंतु तुला माझ्या मर्जीनुसारच परिणाम प्राप्त होतील. पण जेव्हा तू माझ्या इच्छेनुसार कार्य करशील, तेव्हा माझ्या तुझ्या मनोकामना पूर्ण होतील.’ याचाच अर्थ, मनुष्य ईश्वराच्या हुकमानुसार, आज्ञेनुसार कार्य करतो, तेव्हाच प्रत्येक कार्यात त्याला यशप्राप्ती होते, तृप्ती मिळते.
गुरू नानकांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वराच्या हुकमानुसार व्यतीत केल्यानेच ते महान बनले. काही लोकांना ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे जगण्याची इच्छा तर असते, परंतु प्रत्यक्षात ते तसे जगू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रस्तुत पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
गुरू नानकांनी त्या काळात प्रचलित असलेल्या कर्मकांडांवर आपल्या वाणीनं कठोर प्रहार केले, जनसामान्यात जागृती आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरळ, सहज, रसाळ भाषेत ज्ञानाचा प्रचार-प्रसार केला. मोक्षाच्या दिशेनं अग्रेसर होण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आजही लोक घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे चरित्र वाचून आपणही आनंदाचा खजिना प्राप्त करू या.
