Payal Books
TUMHICH TUMCHE BHAGYAVIDHATE – BADLA BHAVISHYA GHADAVA AAYUSHYA by Sirshree
Couldn't load pickup availability
निसर्गाची कार्यपद्धती
‘कसं आहे माझं नशीब! इतके कठोर परिश्रम करूनही काहीच उपयोग नाही,’ आपणही स्वतःविषयी असा विचार करत असाल, तर हे पुस्तक नक्कीच स्वतःला भेट द्या. ही भेट आपल्या जीवनाची काया आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी सकारामक रूपात बदलू शकते.
प्रस्तुत पुस्तक आपल्या भाग्योदयाची किल्ली ठरू शकतं. गरज आहे केवळ आपल्या अनुमतीची. होय! आपल्या अनुमतीशिवाय आपलं नशीबदेखील बदलू शकत नाही. म्हणून या पुस्तकाचं वाचन करून आपलं मन भाग्योदयासाठी प्रत्येक क्षणी राजी करा.
जगात बहुसंख्य लोक स्वमत अथवा लोकमताच्या आधारे आयुष्याचे निर्णय घेत असतात. परंतु मिळालेलं मार्गदर्शन कित्येकदा लोकांना भरकटवून टाकतं. आपलं भाग्य आणि जीवनाला एक नवा आयाम देण्यासाठी, तसंच नकारात्मक भावना आणि दुर्भाग्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हे पुस्तक म्हणजे जणू एक सुवर्णसंधीच! आपण स्वतःला भाग्यवान समजा अथवा दुर्दैवी, दोन्हीही स्थितीत हे पुस्तक आपल्यासाठी वरदान ठरू शकेल. या पुस्तकाद्वारे आपण ज्या अवस्थेत असाल, तेथून अग्रेसर होऊ शकाल.
आपल्या अंतरंगात सुरू असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू प्रार्थनाच! निसर्ग मनुष्याचा प्रत्येक विचार वास्तवात बदलत असतो. पण या वास्तवापासून मनुष्य नेहमी अनभिज्ञ असतो. हे पुस्तक म्हणजे प्रार्थनेच्या शक्तीद्वारे, निसर्गनियमांनुसार आपलं आयुष्य घडवण्याचा जणू एक सुलभ उपायच!
चला तर मग, आता आपलं नशीब बदलण्याच्या, परम भाग्यशाली बनण्याच्या मार्गावर अग्रेसर होऊया. नव्या उमेदीने सर्वांसाठी भाग्योदयाचा मार्ग प्रशस्त करूया…
