Payal Books
VIKAS NIYAM – AATMASANTUSHTICHA RAHASYA by Sirshree
Couldn't load pickup availability
यशाला गवसणी घालण्यासाठी- ‘विकास नियम’
तुम्हाला यशाची सर्व सूत्रं तुमच्या हाती असावीत, असं वाटतं का? मग ‘विकासनियम’ जाणून घ्यायला आजच शुभारंभ करा. कारण ज्यांना यश मिळवायचंय, ते ‘शुभस्य शीघ्रम’ या वचनाप्रमाणे वेळ वाया दवडत नाहीत.
या पुस्तकातला कोणताही भाग वाचताना तुम्हाला प्रत्येक पानावर गवसेल, तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर! कारण यात सामावलाय, जीवनाच्या संपूर्ण विकासाचा नियम. या नियमानुसार, विश्वातील प्रत्येक वस्तुत आणि मनुष्यात विकासाच्या अनंत शक्यता दडलेल्या असतात. या सर्व शक्यता जेव्हा वास्तवात उतरतात, तेव्हाच त्या वस्तुचा किंवा मनुष्याचा ‘संपूर्ण विकास’ होतो. ‘विकास-नियम’ वाचून तुम्ही पुढील रहस्यं जाणू शकता :
विकास नियमांचा महामंत्र कोणता
विकासाचा आरंभ कोठून आणि कसा होतो
विकासाचा मार्ग कसा निवडावा
आत्मविकास कसा साधावा
मनुष्याचा सर्वोच्च विकास कधी होतो
स्वतःच्या आणि इतरांच्या विचार करण्याच्या पद्धतीमागचं कारण
प्रस्तुत पुस्तकात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. याशिवाय यात आहेत, रोजच्या जगण्यात वापरायची सोपी तंत्रं आणि यशाला गवसणी घालण्याचं रहस्य!
