Payal Books
SHISHYA UPANISHAD – GURU-SHISHYA YANCHYA SAKSHATKARACHYA KATHA by Sirshree
Couldn't load pickup availability
बंधनांतून मुक्ती मिळवण्याचा सहज सोपा मार्ग
संघाच्या रंगानं मनुष्याचं अवघं जीवन उजळून निघतं. तुम्हाला कोणत्या रंगात रंगून जायचं आहे, त्या रंगाऱ्याला आवर्जून भेटा. सर्व प्रकारच्या बंधनांतून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर जो आधीपासूनच बंधनांतून मुक्त झालेला आहे, त्याला शरण (संघात-सत्संगामध्ये) जा. हाच आहे बंधनांतून मुक्त होण्याचा सर्वांत सोपा मार्ग! केवळ गुरूच आपल्या शिष्यांसाठी अशा मार्गांचा आविष्कार करू शकतात.
मनुष्याची इच्छा असेल तर तो गुरूंच्या सान्निध्यात राहून जीवनात आनंदाची पेरणी करू शकतो किंवा त्यांच्यापासून दूर राहून काटेही उगवू शकतो. त्याची इच्छा असेल तर, याच जीवनात नरकाची यात्रा करू शकतो किंवा स्वर्गाचा आनंदही तो उपभोगू शकतो. या दोन्ही दिशा त्याच्यासाठी सताड खुल्या असतात. मनुष्य स्वतःचा मित्र असू शकतो, तसाच शत्रूही असू शकतो. आपलं शरीर हरीकडे नेणारं द्वारही बनू शकतं आणि हरीपासून आपल्याला दूरही करू शकतं. वास्तविक, हे शरीर हरीचं (ईश्वरापर्यंत पोहोचणारं) साधन कसं बनेल, ही कला फार थोडे लोक जाणतात. त्यासाठी आवश्यकता असते, ती त्या द्वारातून आत नेणाऱ्या, योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाची आणि ते ग्रहण करणाऱ्या खऱ्या शिष्याची!
गुरू, ईश्वर आणि आपल्यात जणू एखाद्या पुलाप्रमाणे कार्य करतात. गुरूंचं शरीर सत्याचं स्मरण करून देण्यासाठी निमित्तमात्र असतं. त्यांच्याद्वारे मनुष्यानं सत्यप्राप्ती करून, सत्यात स्थापित व्हायला हवं.
त्याचबरोबर प्रस्तुत पुस्तकात तुम्ही वाचाल-
* नाराज न होता रहस्य जाणून घेण्याचा मार्ग
* गुरूत्व आणि गुरू तत्त्वाच्या आकर्षणाचं रहस्य
* वृत्तींमधून मुक्ती मिळवण्याचं ज्ञान
* जीवनाचे पाच महत्त्वपूर्ण बोध
