Payal Books
AAROGYACHE 3 VARADAAN by Sirshree
Couldn't load pickup availability
आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये कमीत कमी कष्टात आणि वेळात, कोणतेही प्रयत्न न करता जास्तीत जास्त सुखसुविधा मिळवण्याकडे आपला कल वाढीस लागलेला आहे. मनुष्याला योग, नैसर्गिक चिकित्सा (बी.एफ.टी., ई.एफ.टी.) स्वमूत्र चिकित्सा (यु.एफ.टी.) यासारख्या उपचार पद्धती कठीण वाटतात. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. पण या गोष्टींना सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. नव्या युगातील बेजबाबदार विचारपद्धतीमुळे मनुष्याने स्वतःच्या शरीराचे म्हणणे ऐकणे बंद केलेले आहे. आपल्या शरीराचे संकेत समजू न शकल्यामुळे त्याला या सगळ्या चिकित्सा अनैसर्गिक आणि विचित्र वाटतात.
निसर्गाकडून ज्या गोष्टी अगदी सहज मिळतात, लोकांच्या दृष्टीने त्या गोष्टींना कमी महत्त्व असते. पण दुर्मिळ गोष्टींचे महत्त्व सातत्याने वाढत जाते. यू.एफ.टी. (स्वमूळ चिकित्सा), बी.एफ.टी. आणि ई.एफ.टी. या अत्यंत साध्या आणि सरळ पद्धती आहेत. त्यांच्या उपयोगासाठी आपल्याला दुसर्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
Name(required)
