Skip to product information
1 of 2

Payal Books

SAMSYANVAR MAAT – 18 UPAYANCHI CHOTI GEETA by Sirshree

Regular price Rs. 71.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 71.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

अलौकिक यशप्राप्तीचे उपाय

 

* ‘तुम्ही कधी अपयशी झालाय का?’

होय. यश हेच अपयशाचं फलित रूप आहे. परंतु मनुष्याला जोवर यश मिळत नाही, तोवर तो हे मान्य करत नाही.

 

* ‘पैसा, पद, प्रतिष्ठा न मिळणं म्हणजेच अपयश आहे का?’

पैसा, पद, प्रतिष्ठा प्राप्त न करता येणं म्हणजे अपयश नव्हे, तर निराश होणं म्हणजेच अपयश.

 

* ‘यश मिळवण्याच्या मार्गात अपयश बळ बनू शकतं का?’

होय. अपयशच यशप्राप्तीचं बळ बनू शकतं. अपयश मिळूनही मनुष्य अधिक जोमानं कार्यरत होऊन, अत्यंत कठीण कार्यातदेखील यश प्राप्त करू शकतो. अशी इतिहासात अनेक उदाहरणं आहेत.

 

* ‘अपयशातदेखील एखादं कौशल्य दडलेलं असतं का?’

अपयशामुळेच मनुष्य आपल्या सर्व चुकांमधून मुक्त होतो. तसंच स्वतःमध्ये संयम, विश्वास आणि क्षमता या गुणांचं संवर्धन करून अपयशाशी दोन हात करण्यासाठी सिद्ध होतो, हेच अपयशाचं सौंदर्य, वैशिष्ट्य आहे.

 

* ‘निराशा आणि अपयश हेच अंतिम यशप्राप्तीचे आधारस्तंभ आहेत का?’

अंतिम यशापर्यंत पोहोचण्यासाठी निराशेचा धक्का वरदान आहे.

 

अपयशाशी सामना करण्याची जिद्द म्हणजे प्रस्तुत पुस्तक… जेे वाचून अपयशाचा एक नवीन अर्थ तुमच्यात उदयास येईल. त्यानंतरच अपयश फलित होऊन तुम्ही यशाचं शिखर गाठू शकाल. जिथे यश आणि अपयश हे एकमेकांचे विरोधक न ठरता परस्परांसाठी पूरक बनतील.