Payal Books
NATYANMADHYE APEKSHA THEVAVAT KI THEU NAYET By Sirshree
Couldn't load pickup availability
अस्वस्थतेतूनही मिळवा मनःशांती
इच्छा-अपेक्षांमुळे निर्माण झालेलं अशांत जीवन जगण्यापेक्षा, त्या भावना प्रकाशात आणून शांतीच्या दिशेनं वाटचाल करा. पुढील लोकांविषयी आपल्याही काही अपेक्षा आहेत का?
माझ्या पतीने अधिकाधिक वेळ माझ्या सहवासात व्यतीत करावा.
माझ्या पत्नीनं माझ्या कुटुंबीयांशी चांगलं वागावं.
मुलांनी वेळोवेळी वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात.
मुलांनी माझं ऐकावं, आज्ञापालन करावं.
आई-वडिलांनी मला थोडंतरी स्वातंत्र्य द्यायलाच हवं.
कर्मचार्यांनी त्यांना सोपवलेलं काम वेळेवर पूर्ण करायला हवं.
शेजार्यांनी आपल्या घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालू नये.
माझी गाडी रस्त्यात नादुरुस्त होऊ नये.
यांचं उत्तर जर ‘हो’ असं असेल, तर हे पुस्तक आपल्याला इच्छा, आकांक्षा आणि अशांतीतून मुक्त करण्यास दिशादर्शक ठरेल. प्रस्तुत पुस्तकातील कथा वाचल्याने आपल्या अपेक्षा आपोआपच कमी होतील. आपल्या कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंधांत माधुर्य निर्माण होऊन, ते अधिकाधिक दृढ होतील.
