Payal Books
RAMKRISHNA PARAMHANS – BHAKTICHYA BHAKTACHE SUNDAR JEEVAN By Sirshree
Couldn't load pickup availability
भक्तीच्या भक्ताचं सुंदर जीवन
दक्षिणेश्वरमध्ये स्थित कालीमातेच्या मंदिरातील पुजारी श्री रामकृष्ण परमहंस नित्य हृदयस्थ असत. त्यांचे जीवन भक्तीने ओथंबलेले होते. प्रस्तुत पुस्तक अशा भक्तीच्या भक्ताचे जीवन-चरित्र आणि उपदेशांचे सादरीकरण आहे. यात त्यांच्या बालपणापासून ते दक्षिणेश्वरपर्यंतचे विविध किस्से अत्यंत मनोवेधक पद्धतीने मांडलेले आहेत.
सुंदर आणि सुबोध शैलीत लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे रामकृष्ण आणि त्यांच्या शिष्यांदरम्यान घडलेले विलक्षण संवाद आणि त्यात दडलेला गूढार्थ अत्यंत सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडते.
रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांची परीक्षा कशाप्रकारे घेत आणि काही शिष्य त्यांची परीक्षा कशी घेत, याचे कडू-गोड किस्सेही या पुस्तकात अत्यंत समर्पकपणे प्रस्तुत केले आहेत.
रामकृष्णांच्या साध्या-सरळ आणि प्रामाणिक गोष्टी आणि त्यांचे निर्लिप्त ज्ञान आजही लोकांमध्ये भक्तिभाव जागृत करते.
चला तर, त्यांचं हे चरित्र वाचून आपणही भक्ती, विश्वास आणि ईशस्तवन करायला शिकूया…
