Netaji Subhash Chandra Bose, by Krushna Bose कृष्णा बोस, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष
नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातीलनामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेलासुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या
ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत
त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या
जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं. नेताजींचं आयुष्य
उलगडण्यासाठी कृष्णा । बोस यांनी संबंध उपखंडात आणि जगभर प्रवास केला. आपल्या
संशोधनातून गवसलेल्या गोष्टी त्या एकत्र जोडत जातात, तशी सुभाषचंद्र बोस यांच्या
राजकीय प्रेरणा, त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध, आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
त्यांनी हाती घेतलेले ऐतिहासिक प्रवास व धाडसी लष्करी मोहिमा यांविषयी आपल्याला
विलक्षण नवी अंतर्दृष्टी प्राप्त होते. आझाद हिंद सेनेने जिथे झुंजार लढत दिली ती मणिपूरची
युद्धभूमी, नेताजींनी जिथे तिरंगा फडकावला ते अंदमान; आझाद हिंद सेनेने जिथे आकार
घेतला ते सिंगापूर; व्हिएन्ना आणि प्राग ही नेताजींची युरोपातली आवडती शहरं; आणि
जिथे त्यांच्या जीवनाचा दुर्दैवी अंत झाला, ते तैपेई या सर्व ठिकाणांना आपण भेट देतो.
आपली गाठ नेहरू आणि गांधींपासून ते तोजो आणि हिटलरपर्यंत नेताजींना समकालीन
असलेल्या प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वांशी पडते. शिवाय, आझाद हिंद फौजेच्या एकजुटीची
आणि लढाईतील शौर्याची कहाणी उत्कंठावर्धक तपशिलांसह आपल्याला समजते. या
फौजेतल्या केवळ पुरुषांनीच नव्हे; तर झाशीची राणी पलटणीतल्या स्त्रियांनीदेखील
लढाईत पराक्रम गाजवला. या पुस्तकात आपल्याला भेटणाऱ्या अनेक व्यक्तींना कृष्णा बोस
अगदी जवळून ओळखत होत्या. त्यांमध्ये सुभाष यांच्या मानलेल्या आई बसंतीदेवी;
त्यांच्या पत्नी एमिली शेन्केल; लक्ष्मी सहगल, अबिद हसन आणि आझाद हिंद
चळवळीतले इतर अनेक आघाडीचे सैनिक या सर्वांनी खूप महत्त्वाच्या आठवणी
सांगितल्या आणि नेताजींची जीवनकहाणी पूर्ण करायला मदत झाली.