Payal Books
YUVAKANCHE ADARSH SWAMI VIVEKANAND – YASHASVI AANI CHARITRAVAAN BANANYACHA RAJMARG
Couldn't load pickup availability
द यूथ आयकॉन – स्वामी विवेकानंद
‘विश्वातील सर्व समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता युवकांमध्ये आहे,’ असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनाद्वारे दर्शविला. त्यांनी त्यांच्या 39 वर्षांच्या जीवनकाळात शतकानुशतके उपयुक्त ठरेल, असं मार्गदर्शन युवापिढीसाठी केलं.
प्राप्तपरिस्थितीत युवकांना जीवनात येणार्या आव्हानांचा सामना करणं अतिशय कठीण जातं, तेव्हा स्वामी विवेकानंदांचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. ही बाब लक्षात घेऊनच प्रस्तुत पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहोत.
विशेषतः युवकांसाठी तयार केलेल्या या पुस्तकात यशाची दहा सूत्रं आणि चारित्र्य बलवान करण्याचे पाच उपाय दिलेले आहेत. खरंतर स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण जीवनच युवकांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु प्रस्तुत पुस्तकात त्यांच्या जीवनातील काही वैशिष्ट्यपूर्ण आणि निवडक असे प्रसंग दिले आहेत, जे चुकीच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या उद्दिष्टाप्रत अग्रेसर होण्यासाठी साहाय्यक ठरतील.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनप्रेरणेतून प्रत्येक युवक-युवतीने विवेकपूर्ण आयुष्य जगावं आणि त्यांच्या गुणांची अभिव्यक्ती करावी, हीच शुभेच्छा!
