Payal Books
ADI SHANKARACHARYA – SHAASTRARTHACHYA SHASTRANE ADNYANACHA ASTA
Couldn't load pickup availability
अंतर्मनाचा मार्ग – आत्मसाक्षात्काराचा प्रसार
आज मनुष्यजीवनात मनोरंजनाच्या साधनांची सुख-सुविधा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देश-विदेश तसेच विविध शास्त्रांची माहिती त्याच्या मुठीत आली आहे. अशी संपन्नता असूनही त्याच्या दुःखाला व असंतोषाला काही सीमा नाही. बाह्यतः ज्याला आपण विकास म्हणतो तो माणसाला आतून अजूनच पोकळ बनवत आहे. कारण आज नव-नवीन मोह व आसक्तीने माणसाला घेरलेले आहे.
रोज नवीन इच्छा जन्म घेतात आणि त्यांच्या पूर्ततेकरिता मनुष्य धावपळ करतो; पण मग त्यांचा अंत कुठे आहे? तर तो आहे ईश्वराच्या (सेल्फच्या) आविष्कारात! सर्व मनुष्यामध्ये सेल्फची अखंड चेतना सतत प्रकाशमान असते. तिला स्वानुभवाने जाणणे हेच मनुष्यजीवनाचे प्रयोजन आहे. हे प्रयोजन सफल व्हावे यासाठी आदि शंकराचार्यांनी आपल्या छोट्या जीवनकाळात जी अभूतपूर्व कामगिरी केली त्याचे दर्शन हे पुस्तक घडवून देते. त्याचबरोबर जीवन प्रयोजन पूर्ण व्हावे याचाही मार्ग दाखवते.
चला तर मग… पुस्तक वाचता वाचता अंतर्मनात पोहोचू… जे अजूनपर्यंत अप्रकाशित आहे.
