Payal Books
SAVAYEE BADALANYACHE YASHASVI MARG – NAVYA SAVAYINSATHI YASHASVI TANTRA
Couldn't load pickup availability
मास्टर ऑफ गुड हॅबिट
चांगल्या सवयींचे स्वामी कसे बनाल
अशी कोणती चुकीची सवय आहे, जी तुम्हाला अस्वस्थ करते, बेचैन राहण्याची शिक्षा भोगायला भाग पाडते? ही अयोग्य सवयच अस्वस्थतारूपी कोर्टात तुम्हाला खेचते. मात्र, न्यायाधीशाने काही सजा सुनावण्यापूर्वीच ती तुम्ही भोगत असता. याचं कारण आहे, बेहोशीला आपला वकील नेमणं… खरंतर जीवनच आपला न्यायाधीश आहे, जो कोणत्या सवयींनी आपला विकास होतोय आणि कोणत्या सवयी आपलं पतन करतात, हे दर्शवत असतो.
आपल्याला जर या दुःखद सवयीरूपी जेलमधून मुक्त, स्वतंत्र व्हायचं असेल, तर प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* ब्रेन रिवायरिंगद्वारे नव्या सवयी विकसित कशा कराल?
* जुन्या ब्रेन वायरिंगसह नवीन सवयी रिवायरिंग कशा कराल?
* सजगतेसह सवयींचं दर्शन कसं कराल?
* मननाद्वारे चुकीच्या सवयींची व्यर्थता कशी ओळखाल?
* प्रत्येक पावलागणिक अयोग्य सवयींवर प्रहार कसा कराल?
* नव्या सवयी विकसित करण्याची प्रेरणा कशी मिळवाल?
* यशस्वी लोकांच्या सवयी कशा अंगीकाराल?
वाचक हो, आता वेळ आली आहे, नव्या सवयी आत्मसात करून योग्य निर्णय घेण्याची, यशाप्रत पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची..
