Skip to product information
1 of 2

Payal Books

MAGIC OF GOD BLESS YOU – SADBHAVNANCHI ADRUSHYA SHAKTI

Regular price Rs. 158.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 158.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

करुणारूप

ी किरणाची जादूBLESS TO BLISS

 

लेझर लाइट, फोकस लाइट, प्रोजेक्टर लाइट किंवा समुद्रात उभं असणारं लाइट हाउस… सर्व प्रकारच्या लाइट्स आपापल्या किरणांची जादू सर्वदूर पसरवत असतात; रंगांची आणि प्रकाशाची उधळण करत असतात. यामुळे बाह्यजगत उजळून निघतं; पण एक किरण असाही असतो ज्यामुळे तुमचं अंतर्जगत उजळून निघतं. तो कोणता किरण असतो हे तुम्हाला माहीत आहे का?

 

सागरात उभं असणारं लाइट हाउस इतरांना तर प्रकाश देतंच; पण आपल्या चारी बाजूंना प्रकाशाची मुक्त उधळण करतं. परिणामी, त्याच्या आसपास असलेल्या सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसू लागतात. अगदी याचप्रकारे, आपणही जेव्हा इतरांसाठी मंगल भावना बाळगतो तेव्हा आपल्याही जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. जसे :

 

* जीवनात सर्व काही सहजतेनं घडू लागतं.

* जीवनाचा प्रत्येक पैलू किरणांच्या प्रकाशात झळाळून निघतो.

* मानसिक स्तरावर आपलं जीवन शांतीपूर्ण होतं.

* सामाजिक स्तरावर आपले नातेसंबंध प्रेमाने ओतप्रोत भरतात.

* जीवनात समृद्धीचा वर्षाव होतो.

* आपलं अंतर्मन शुद्ध आणि पवित्र होतं. अशा पवित्र मनातून सर्वांसाठी केवळ प्रेमाचाच वर्षाव होतो, प्रार्थनांची पखरण होते.

* भय, क्रोध, चिंता, समस्या विलीन होतात.

* खुल्या मनाने निर्णय घेणं सहजसोपं होतं.

 

प्रज्वलित झालेल्या एका दिव्याने तुमच्या घराचा कानाकोपरा उजळून निघतो. अगदी त्याचप्रकारे, प्रस्तुत ग्रंथदीप तुमच्या मनाचा प्रत्येक कोपरा उजळून काढेल. या ग्रंथदीपाला करुणारूपी किरणांच्या वर्षावाने आपलं आणि इतरांचं जीवन प्रेम, आनंद आणि मौनाने भरू द्या.