Skip to product information
1 of 2

Payal Books

MOKSH PATH RAHASYA – EK MARG, EK AAYAAM AANI EK ANUBHAV

Regular price Rs. 158.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 158.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

मोक्ष-एक अंतर्दृष्टी

मोक्ष… आपल्याच अंतरंगात आहे, आपल्या अंतर्यामी विराजमान आहे. मोक्षाचा अनुभव होण्यासाठी आपल्याकडे तेज अंतर्दृष्टी असायला हवी. समग्र समज सजगता आणि सराव यांमुळे समग्र समज वाढू लागते. प्रस्तुत पुस्तक तुमच्यातील सजगता वृद्धिंगत करून मोक्षाची रहस्ये तुमच्यासमोर उलगडतं. या पुस्तकात सांगितलं आहे ः

 

* मोक्ष ही प्रत्येक मनुष्याची आवश्यकता आणि मोक्षप्राप्ती सहजसाध्य आहे.

* मृत्यूनंतर नव्हे, तर जिवंतपणीच मोक्षप्राप्ती होऊ शकते.

* मोक्षप्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही; तर संसारात राहून, त्यालाच निमित्त

बनवून मोक्ष प्राप्त करता येऊ शकतो.

* शरीराचा मृत्यू म्हणजे मोक्ष नसून, अहंकाराच्या जन्म-मरणातून मुक्ती म्हणजेच मोक्ष!

 

मोक्ष म्हणजे चेतनेची ती अवस्था, जिथे सर्व प्रकारचे चुकीचे पूर्वग्रह, धारणा, बंधनं समाप्त होतात आणि मनुष्य परमचेतनेशी ताळमेळ साधतो. मग आता जीवन हे एखाद्या खेळाप्रमाणे असतं; प्रत्येक कार्यात सर्वोच्च गुणवत्ता असते… मग हे कार्य कोणत्याही क्षेत्रातील असो! तुमच्या सभोवताली मोक्षप्राप्त गृहिणी, डॉक्टर्स, शिक्षक, संशोधक आहेत ही कल्पना तुम्ही करू शकता का? होय! हे खरंच शक्य आहे. कसं? हीच समज या पुस्तकात देण्यात आली आहे.

 

प्रस्तुत पुस्तक त्या सर्वोच्च आंतरिक समजेला प्रकाशित करतं, जिच्या प्रकाशात तुम्ही तुमच्या सर्वोच्च शुद्ध स्व-रूपाचं दर्शन कराल.

 

चला तर मग, प्रस्तुत पुस्तकरूपी आरसा उघडा… त्यात मोक्षाचा चेहरा तुमची प्रतीक्षा करतोय…