Payal Books
DEPRESSIONLA KARA BYE-BYE -SWATHACHE COUNSELLOR SWATHACH BANA
Couldn't load pickup availability
डिप्रेशनला करा बाय-बाय
स्वतःचे काउन्सेलर स्वतःच बना
निराशेमध्ये आशेचा किरण
आशेचं उड्डाण किती उंच असू शकतं, याची कल्पना करा. हे उड्डाण केवळ मनुष्यच करू शकतो. कारण तोच एक असा प्राणी आहे, जो आशा-निराशेमध्ये हेलकावे खात असतो.
जीवनात निराशा येते तेव्हा हेच उड्डाण खाली-खाली येतं. त्या वेळी मनुष्य स्वत:ला लाचार समजतो, दु:खात, डिप्रेशनमध्ये जगू लागतो. आशावादी विचार काय करू शकतात, याची त्याला कल्पनाच नसते.
आशेचा किरण गवसलेला नसतानाही जर कोणी आपल्या विचारांवर काम सुरू केलं, तर त्या व्यक्तीला आपल्या दु:खावर निश्चितच औषध सापडेल. डिप्रेशनवरचा उपाय त्याला स्वत:मध्येच गवसेल.
प्रत्येक समस्येचं उत्तर मनुष्यात आधीपासूनच उपलब्ध आहे. आवश्यकता आहे केवळ ती टॅप करण्याची, क्लिक करण्याची. क्लिक केल्याशिवाय आपल्या मोबाईल फोनमध्येही काही उघडत नाही, तर मग आपल्या अंर्तयामी असलेली उत्तरं कशी मिळतील? म्हणून माणसाने क्लिक करायला शिकायला हवं.
या पुस्तकामध्ये अशा पद्धती सांगितल्या गेल्या आहेत, ज्यांच्या उपयोगाने निराशेनं ग्रासलेल्या माणसामध्ये जीवनाची आस जागून तो आशारूपी गरुडझेप घेऊ शकेल. या पुस्तकात वाचा-
1. स्वास्थ्यशक्ती वाढवण्यासाठी काउन्सेलर कसं व्हायचं?
2. डिप्रेशनमधून बाहेर येण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय कोणते?
3. डिप्रेशनपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
4. छोट्या आणि उपयुक्त मंत्रवाक्यांद्वारा निराशा कशी दूर करावी?
5. निराशेवरून फोकस हटवण्याच्या विविध पद्धती कोणत्या?
6. डिप्रेशनमधून मुक्त होण्याचं सर्वोत्तम टूल?
7. निराशेमध्ये आशेचा किरण हे काय आहे?
8. डिप्रेशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवनाची इच्छा आणि आशेचा मार्ग कशी उपयुक्त सिद्ध होते?
