Skip to product information
1 of 2

Payal Books

POWER OF TUNING – SECRET OF ALIGNMENT

Regular price Rs. 158.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 158.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

पॉवर ऑफ ट्युनिंग

Secret of Alignment

ताळमेळाच्या शक्तीने अनोखा उपहार उघडा

आपल्यासाठी एक भेट सदैव उपलब्ध आहे, हे तुम्ही जाणता का? हा उपहार प्राप्त करून ऊर्जा आणि आनंदाने ओतप्रोत असं जीवन तुम्ही निश्चितच जगू शकता. संपूर्ण सृष्टीत आपल्यासाठी एक अनोखी भेट दडलेली आहे. शिवाय हा उपहार त्यालाच मिळतो, जो निसर्गाशी ताळमेळ साधतो, सरस नियमांशी योग्यप्रकारे परिचित होतो.

ही भेट प्राप्त करण्याची जर तुमची इच्छा असेल तर प्रस्तुत पुस्तक निश्चितच तुम्हाला साहाय्यक ठरेल. यात खूपच सरळ आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे संकेत दिले आहेत. ते जाणून तुम्ही सहजपणे ही भेट प्राप्त करू शकता. इतकंच नव्हे तर स्वतःसह इतरांचं जीवनही आनंदाने प्रकाशित करू शकता. याखेरीज या पुस्तकाद्वारे जाणून घेऊ-

असे कोणते नियम आहेत, जे जाणून घेऊन आपण सहजपणे प्रत्येक घटनेत संतुलन साधू शकतो?

तो कोण आहे? कसा आहे? ज्याच्याद्वारे बोध प्राप्त करून आपण मधुर नात्यांसह स्वास्थ्यपूर्ण आणि समृद्धीयुक्त जीवन जगू शकतो?

अशा कोणत्या चुकीच्या सवयी आहेत, ज्यामुळे आपण या नियमांपासून दूर जातो?

हे पुस्तक आपल्यासमोर असे गूढ रहस्य उलगडेल, जे जाणून तुम्ही तुमचं जीवन यशस्वी, प्रभावी आणि अर्थपूर्ण बनवाल.

चला तर मग, हा अमूल्य उपहार आपण धीराने उघडू आणि आपल्या जीवनात काय चमत्कार होतात ते पाहू…