Payal Books
Parakrami Hundu Rajyanchi Adwitiy Mandire By Dipa Mandalik पराक्रमी हिंदू राज्यांची अद्वितीय मंदिरे
Couldn't load pickup availability
प्राचीन भारताच्या उन्नत संस्कृतीचा अद्भुत मानबिंदू म्हणजे आपली पुरातन मंदिरे. या मंदिरांच्या कणाकणांत इतिहासाचा श्रीमंत खजिना भरून राहिला आहे, जो आपल्या पूर्वजांनी वारसारूपाने आपल्याकडे सोपवला आहे. आणि म्हणूनच तो प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायलाच हवा. हाच उद्देश पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे या पुस्तकाचा आहे. या पुस्तकात महापराक्रमी हिंदू राजांनी उभारलेली सात अद्वितीय मंदिरे आपण बघणार आहोत. लेखिकेसोबत मंदिरात प्रवेश करून त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, मनोरम शिल्परचना, अभियांत्रिकी आश्चर्य या गोष्टींची माहिती करून घेत, या मंदिरांमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, रंजक कथा, मंदिर उभारणाऱ्या राजांचे पराक्रम, त्यांच्या घराण्यांची ओळख, देवतेशी जोडलेल्या पुराणकथा जाणून घेत, समाधानी मनाने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करणार आहोत. या मंदिर वास्तूंना अद्वितीय का म्हणावे, व तो वारसा आपल्या हाती सोपविणारे राजे थोर का आहेत याची उकल या यात्रेत होईल आणि एक भारतीय म्हणून अभिमानाची ज्योत आपल्या मनात अखंड तेवत राहील ही खात्री आहे.

