UTTUNG उत्तुंग by Mrunalini Sawant
श्रीकृष्ण... तो योगीही आहे, भोगीही आहे, राजकारणी आहे, समाजकारणी आहे... अनेक रूपं आहेत त्याची...काही लुभावणारी, काही शिकवण देणारी...मृणालिनी सावंत यांना त्याचं कर्मयोगी, लोकनायकाचं रूप आवाहन करून गेलं आणि ईश्वरी अवतार असलेल्या कृष्णामधील ईश्वरी अंश मान्य करूनही त्याच्यातील मानवीय 'उत्तुंगता त्यांना अधोरेखित कराविशी वाटली... म्हणून काही ठिकाणी चमत्कारांना फाटा देत कृष्ण आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं, विशेषतः वसुदेव, नंद, अक्रूर इ. यांचं चातुर्य, त्यांचा विवेक याचं दर्शन त्यांनी घडवलं.
कृष्णाची बुद्धिमत्ता, त्याची समयसूचकता, निर्भीडपणा, पराक्रम, हजरजबाबीपणा, निर्लिप्तता, सर्वसामान्य माणसाविषयी त्याला वाटणारी करुणा आदी गुणांनी मंडित असलेलं त्याचं व्यक्तिमत्व मानवी-ईश्वरी रंगातून त्यांनी चितारलंय, गोकुळ द्वारकेतील सु-शासन, कुरुक्षेत्रावरील संहारक युद्ध, द्वारकेचा विनाश आणि त्या विनाशाचा कृष्णाने सहजतेने केलेला स्वीकार याच वैशिष्ट्यपूर्ण भाषेत चित्रण केलंय.
श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा डोळस दृष्टिकोनातून, वैशिष्ट्यपूर्ण भाषेत घडवलेला चिंतनीय आविष्कार.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
उत्तुंग
ईश्वरी रूपाचे मानवी आयाम मांडणारी श्रीकृष्णगाथा
लेखिका:- मृणालिनी सावंत