Skip to product information
1 of 2

Payal Books

Unstoppable By nick Vujicic..अनस्टॉपेबलनिक- वुईचिक

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

अनस्टॉपेबल याचा अर्थ संपूर्ण विश्वास असणं आणि साध्य करणं. तुमचा स्वतःवर, तुमच्या कौशल्यांवर व उद्दिष्टांवर भरवसा असतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमची ईश्वराच्या प्रेमावर व तुमच्या जीवनासाठी त्याने बनवलेल्या योजनेवर श्रद्धा असते.

 

जगातले (लाखो) लोक निक वुईचिकचा प्रेरणादायी संदेश व त्याचा दुसरा चेहरा ओळखतात. जन्मतःच हात व पाय नसूनसुद्धा निकने अनेक साहसांचा आनंद लुटला, एक परिपूर्ण व सार्थ करिअर केलं आणि प्रेमळ नातेसंबंध जोपासले. एक विशिष्ट व अद्वितीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. आपलं जीवन मौल्यवान असून ते इतरांसाठी देणगी आहे आणि आयुष्यात कितीही दुःखं व संकटं आली तरी ईश्वर सदैव आपल्यासोबत हजर असतो या वचनांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून निकने सर्व समस्या व यातनांवर मात केली. अखंड विश्वासचं कृतीमध्ये रूपांतर होताना जी शक्ती प्रवाहित होते. त्याला निक आपल्या यशाचं श्रेय देतो.

 

परंतु हे सगळं घडतं कसं? अनस्टॉपेबल मधे निकने अशा समस्या व प्रतिकूल परिस्थितीचं वर्णन केलयं ज्यांना अनेक लोकांना आज सामोरं जावं लागतंय, उदा :

 

वैयक्तिक संकटं, आत्मघातकी विचार, भावना व व्यसने, नातेसंबंधातील समस्या, दुसर्‍यांना त्रास देणे, निर्दयीपणा व सहनशीलतेचा अभाव, करिअर व नोकरीमधील आव्हानं, शरीर, मन, हृदय व आत्मा यांतील असंतुलन, आरोग्य व अपंगत्व याबद्दल चिंता, निमंत्रण / ताबा सुटल्याची भावना

 

स्वतःच्या आयुष्यातील घटनांमधून व इतर काही जणांच्या अनुभवावरून निक दाखवून देतो,की अनस्टॉपेबल बनण्यासाठी व ‘‘उत्तम जीवन’’ जगण्यासाठी या समस्यांना कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा. तुमच्या मार्गात कोणता अडथळा आहे? अनस्टॉपेबल बनण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?

 

निक वुईचिक प्रेरित करणारा वक्ता आहे, ख्रिश्चन धर्माचा प्रचारक आहे, लेखक व ‘लाइफ विदाउट लिम्ब्स’ या सेवाभावी संस्थेचा संचालक आहे. जगभरातील अनेकांसाठी तो प्रेरणास्थान बनला आहे व तो नेहमीच जनसमुदायाशी संवाद साधून त्यांना अडथळे दूर करण्याचा व स्वप्नं साकार करण्याचा संदेश देत आलाय. बरीच वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यावर निक आता आपली पत्नी कानाएबरोबर दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये राहतो. तुम्ही त्याला पुढील वेबसाईटवर संपर्क करू शकता