Payal Books
Mala bhetleli manasमला भेटलेली माणस डॉ. विश्वास मेहेंदळे
Couldn't load pickup availability
डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या या आत्मवृत्ताचे प्रयोजन आपल्याला आलेल्या विविध अनुभवांचे भांडार वाचकांपुढे खुले करणे एवढेच आहे. आयुष्याच्या वाटचालीत त्यांना काही असाधारण माणसे भेटली. या व्यक्तींची स्वभावचित्रे त्यांनी मोठ्या चटकदार भाषेत रंगविली आहेत. आपल्या सुखःदुखात वाचकांना सहभागी करून घेता घेता त्यांनी वाचकांचे रंजनही केले आहे.
त्यांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या कुणा व्यक्तीबद्दल आकस वा द्वेष मूलक असे काही त्यांनी लिहिलेले नाही. 'आलिया भोगासी' आपण कसे 'सादर' होत गेलो हे त्यांनी निकोप वृत्तीतून सांगितले आहे. खळखळणारा प्रवाह ओलांडून, त्यातील भोवऱ्यांतून स्वतःला वाचवीत नदी पार केल्यावर, आता काठावर बसून ते वाचकांशी शिळोप्याच्या गप्पा करीत आहेत. अशा गप्पागोष्टींचे हे पुस्तक आहे.
