Payal Books
Mediclaim ani health insuranceमेडिक्लेम आणि हेल्थ इन्श्युरन्स-- प्रा.क्षितिज पाटुकले
Couldn't load pickup availability
अपघात आणि हॉस्पिटलायझेशन कधीही निमंत्रण देऊन येत नाही.. प्रत्येक शहाण्या माणसाने मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स घेतलाच पाहिजे... कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे हॉस्पिटलायझेशन तुमचे दिवाळे काढायला पुरेसे आहे.....
मेडिक्लेमचा हप्ता म्हणजे वायफळ खर्च नसून हॉस्पिटलायझेशनमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीच्या धोक्यापासूनच्या संरक्षणाची मोजलेली किंमत आहे. जितक्या शक्य तितक्या लवकर कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा घेतला पाहिजे.
मेडिक्लेम घेण्याआधी संकल्पना नीट समजून घेतली तर क्लेम मिळायला कोणतीही अडचण येत नाही. वाढते वैद्यकीय खर्च, गतिमान जीवनपद्धती आणि वाढते अपघात यांपासून संरक्षणाचा एकमेव मार्ग- मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स.
आरोग्यविमा हे आजारपण आणि हॉस्पिटलायझेशन यांमुळे होणाऱ्या आर्थिक भुर्दंडाची भरपाई करण्याचे एक प्रभावी साधन आहे. आपल्या तरुण आणि कमावत्या वयातच अनोळखी आणि अनपेक्षित आरोग्य जोखिमींचा सामना करण्यासाठी आरोग्यविमा ही एक उत्तम व्यवस्था आहे.
आपले आरोग्य, भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतः साठी आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅनिंग करावे. त्यासाठी मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स कसा, कधी, किती, कोणता आणि कुणाकडून घ्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करणारे अनोखे पुस्तक- मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स.
