Payal Books
Manache band darwaje मनाचे बंद दरवाजेज्योती - मोहन पुजारी
Couldn't load pickup availability
माणसाचं मन म्हणजे एक न सुटणारं कोडं आहे प्रत्येकाच्या मनात अनेक कप्पे असतात. अंतर्मनात विचार, विकार भावनांची वादळं उठतात, विचारांचे सुप्त, प्रगट प्रवाह वाहत असतात. अंतर्मनाच्या पातळीवर चालणारा, भावना विचारांचा संघर्ष, अंतर्मनातच दडपण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. त्यातूनच मनावर येणारा ताण असह्य झाला की तो बाह्यमनाच्या पातळीवर येतो आणि व्यक्तीच्या वर्तनावर त्याचे परिणाम व्हायला लागतात.
स्किझोफ्रेनिया या मानसिक विचाराची कारणं अनेक मेंदूतील जैवरासायनिक बदलापासून ते जेनेटिक रीझन आणि त्याच्या अलीकडे पलीकडे अनेक कारणे असली, तरी या सगळ्यांचे परिणाम सारखेच आहेत. स्किझोफ्रेनिक रुग्ण, वास्तव नाकारून भास, आभासाचं जाळं स्वत:भोवती विणतो आणि त्यात तो गुरफटत जातो, स्किझोफ्रेनियाला मराठीत छिन्नमनस्क म्हणतात.
सामान्य माणसांपेक्षा स्किझोफ्रेनिक रुग्णाचं मन वेगळं असतं, हे रुग्ण वास्तवापासून दूर जातात, या रुग्णांना होणारे भास हेच त्यांच्या दृष्टीने वास्तव असतात, संशायाचा किडा त्यांच्या मेंदूत वळवळत असतो.
माझ्या वाचक मित्र, मैत्रिणींनो आपल्या मनाची दारं घट्ट बंद करून घेतलेल्या, स्किझोफ्रेनिक रुम्णांच्या मनाची, स्पंदन तुमच्यापर्यंत
पोहचवण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
