Gitavrati गीताव्रती --डॉ. माधव पोतदार
इच्छला सदिच्छा बनवण्याकरता एकत्रित झाल पाहिजे. स्थितप्रज्ञाची यदृच्छा आणि महामानवाची ईश्वरेच्छा या मार्गावरची स्वाध्यायीची सदिच्छा ही पहिली पायरी आहे. या सदिच्छेच्या परिणामामुळे माणूस वैयक्तिक जीवनात दीन बनत नाही, लाचार होत नाही किंवा मिंधा रहात नाही. तो कुणाचे उपकार घेत नाही, बापुडा होत नाही, तो स्वार्थी बनत नाही आणि परिस्थिती समोर नमतही नाही. परावलंबी जीवन कधी तो जागत नाही, तो मस्तीत जगत असतो. आत्मगौरवानं शोभणारं त्याचं जीवन अस्मितायुक्त आणि भावपूर्ण असत. तो समाजिक जीवनात कुणाचाही वाईट चिंतीत नाही, वाईट करीत नाही, शक्य असेल तेवढे भलेच करतो. प्रभूला केंद्रबिंदू मानून तो त्याचं काम करू लागतो." असा विचार देऊन या पृथ्वीतलावर नवा माणूस समर्थपणे उभा करणारा हा क्रांतीकारक निष्क्रिय धर्माच्या, शासन, विज्ञान, अर्थकारण, व्यापार या सत्तांच्या, कर्मकांड, जातिभेद, वर्णभेद, उच्चनीचता यांना प्राधान्य देणाऱ्या प्रवाहाच्या विरूध्द चालत राहिला. माणसाने माणसाला प्रेमाने बांधावे, नैतिकतेने जीवन सुगंधीत करावे आणि आपणांसारखे इतरांनीही तात्काळ कारावे या एकाच ध्येयवादाने जगला व जगात अपूर्व अशी नवी क्रांती जन्माला घातली.